फलटण तालुक्यात 61 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 19
फलटण दि. 1 फेब्रुवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 31 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 61 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 19 रुग्ण तर ग्रामीण भागात 42 रुग्ण सापडले आहेत.
दि. 31 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 61 बाधित आहेत. 61 बाधित चाचण्यांमध्ये 20 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 41 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 19 तर ग्रामीण भागात 42 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण काळज 1, कोळकी 5, कुरवली खुर्द 1, विडणी 1, भाडळी बुद्रुक 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, साखरवाडी 1, सुरवडी 3, दुधेबावी ,1, गुणवरे 2, ठाकुरकी 1, बरड 1, हिंगणगाव 2, शिंदेवाडी 1, तिरकवाडी 1, निरगुडी 1, फडतरवाडी 1, सोमंथळी 2, सोनवडी खुर्द 2,सस्तेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, वेळोशी 1, चौधरवाडी 2, तरडफ 1, तरडगाव 1, जाधववाडी 2, आसू 1, नातेपुते तालुका माळशिरस 1 गुरसाळे तालुका माळशिरस 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments