मोफत १७५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि १५०० नंबरचे चष्मे वाटप : अनुप शहा
फलटण : छ. शिवाजी महाराज जयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा, निलेश चिंचकर, प्रसाद पाटील, सागर शहा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या नेत्रचिकित्सा, मोफत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीरास मोठा प्रतिसाद लाभला असून या शिबीरामध्ये जवळपास दीड हजार पेक्षा जास्त लोकांना चष्मे वाटप करण्यात आले असून १७५ पेक्षा जास्त लोकांची डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, महंमदवाडी, हडपसर पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या नेत्र तपासणी,मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने डोळ्याचे नंबर काढून मोफत चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये सर्व मिळून तीन हजार लोकांची तपासणी करण्यात आली
शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध शिबीरार्थीच्या हस्ते अड. सौ. जिजामला नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिबीरास भेट देऊन रुग्ण, नातेवाईक, नागरिक यांच्याशी चर्चा केली, यावेळी त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत पवार, सुमित चोरमले, निखिल उपाध्ये, देवांना पाटील, दादा साप्ते, विकास बोराटे, अजय शिंदे, दिगंबर लाळगे, अक्षय पंडित, सोनू लाळगे, यांनी विशेष प्रयत्न केले.
No comments