Breaking News

धरणे उभी करणे हे जर पाप असेल, तर पापी असण्यात आनंद आहे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

If it is a sin to build a dam, then it is a pleasure to be a sinner - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी - पुण्यवान लोकप्रतिनिधी जे पुण्य करतात ते मला जमत नाही. माझ्या 'पापा मुळे महाराष्ट्राचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले  आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे जी १९९६ च्या पुढे सुरु झाली त्यात उरमोडी, तारळी, जिहे कठापूर हे प्रोजेक्ट आहेत, हे पाप असेल तर पापी असण्यात मला आनंद आहे. पुण्यवनांचे आभार असा सणसणीत टोला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला आहे.

    माण तालुक्यातील सितामाई घाट रस्त्याचे भूमीपूजन माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला श्रीमंत रामराजे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून  विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

    सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना असा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी असे म्हटले आहे की, 'पुण्यवान' लोकप्रतिनिधी जे पुण्य करतात तसले मला जमत नाही, माझ्या पापा मुळे राज्याचे कृष्णा लवादाचे पाणी वाचले. तसेच जिल्ह्यातील १९९६ पासून जी धरणे सुरु झाली. त्यामध्ये उरमोडी, तारळी आणि जिहे कटापूर हे प्रकल्प आहेत. हे पाप असेल तर 'पापी' असण्यातच मला आनंद आहे. 'पुण्यवान' लोकप्रतिनिधी जे पुण्य करतात तसले मला जमत नाही, असा असे प्रतिटोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आ. जयकुमार गोरे यांना लगावला आहे.

No comments