कांबळेश्वर विकास सोसायटीवर खासदार गटाचे वर्चस्व
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ता.फलटण पंचवार्षिक निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या भिवाईदेवी विकास पॅनलने कांबळेश्वर ता.फलटण पंचवार्षिक निवडणुकीत १३ पैकी १३ जागा जिंकून राजे गटाचा दारुण पराभव केला आहे. सोसायटीची निवडणूक अटीतटीची झाली, दोन्ही गटाच्या पॅनेलने प्रचारात अनेक विकासाचे मुद्दे उपस्थित केले. मतदारांना आपल्याला मतदान का द्यावे हे पटवून दिले. मात्र सुज्ञ मतदारांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भिवाईदेवी शेतकरी विकास पॅनलचा सहकार्य केल्याचे निकालावरून स्पष्ट दिसत आहे. मतदारांनी विश्वास दाखवून सोसायटीचा निकाल १३ विरुद्ध ० केला आहे. या कामी माढा लोकसभा मतदार संघाचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ताकद व मार्गदर्शन लाभले आहे. एकूणच सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासन आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या पॅनलला लोकांनी निवडणून दिल्याचे निकालात दिसत आहे. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषद सदस्या ॲड.सौ जिजामाला ना.निंबाळकर यांच्या सूचनेनुसार स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत ना.निंबाळकर यांनी विजय उमेदवार अनुक्रमे तानाजी बापुराव मदने,हनुमंत बाबुराव भिसे,पोपट बाबुराव भिसे, दत्तात्रेय गणपत भिसे, बाळासो बापूराव कोळेकर, बापूराव गेनबा भिसे,संदीप पांडुरंग बिबे,रामचंद्र नाथ्याबा भिसे,सुदाम चिमाजी वाघ,गौतम सिलेमान भिसे,शामराव बबनराव भिसे,सौ.सविता सुभाष भिसे,श्रीमती गोदाबाई शिवाजी भिसे यांचे व पॅनलचे गाव पातळीवर नेतृत्व करणारे विजयराव भिसे,दत्तात्रय भिसे,नारायण सरक,बापूराव शिंगाडे, आकाश धायगुडे,मनोज भिसे व इतरांचा विजय मिळवल्याबद्दल हार घालून सत्कार करण्यात आला. निकाल लागल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतीषबाजी करत गुलालाची उधळण करत जंगी मिरवणूक काढण्यात आली.
No comments