Breaking News

तडवळे सोसायटीवर खासदार गटाची सत्ता

khasdar group wins Tadwale Vikas Society election

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - तडवळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांच्या नेतृत्वाखालील  श्री. भैरवनाथ व श्री. सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनलच्या १२ उमेदवारांनी १०० मतांच्या फरकाने विजय मिळवला.  
     सर्व विजयी उमेदवारांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
    या निवडणुकीसाठी माजी चेअरमन राजेश खराडे, माजी सरपंच रामचंद्र खराडे, माजी चेअरमन पोपटराव बबनराव खराडे, पोपट नाना खराडे पाटील, जयवंत सोनवणे, शंकरराव भोसले, सोमनाथ गायकवाड, साधू टिळेकर, शिवाजी भोसले, रमेश दादा गायकवाड, वसीम इनामदार, प्रकाश शहा, मनोज खराडे, मनोहर खराडे, शेखर खराडे, पांडुरंग संपतराव खराडे, वैभव जगन्नाथ खराडे, आनंदा बोडरे व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे हा विजय सुखकर झाला. या विजयामुळे संपूर्ण तडवळे व खराडेवाडी गावांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

No comments