विवाहितेची आत्महत्या ; सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ फेब्रुवारी - तुझ्या डिलीव्हीरीला झालेला दवाखान्याचा खर्च, तुझ्या आई वडीलांकडुन घेवुन ये, असे म्हणुन विवाहितेला मारहाण करुन, सासरे त्रात देत असत, त्याच त्रासाला कंटाळुन विवाहितेने आत्महत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेच्या आईने दिली असून, या प्रकरणी विवाहितेचे सासरे बाळु ज्ञानदेव खरात यांच्यावर जाचहाट करणे व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ऑगस्ट २०१९ पासुन ते दिनांक २१ जानेवारी २०२२ चे दरम्यान ज्योती नितीन खरात हीस तिचे सासरे बाळु ज्ञानदेव खरात हे, तुझ्या डिलीव्हीरीसाठी झालेल्या दवाखान्याचा खर्च, तुझ्या आई वडीलांकडुन घेवुन ये, असे म्हणुन मारहाण करुन, त्रात देत असत. त्याच त्रासाला कंटाळुन विवाहितेने दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी आत्महत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेची आई सौ.तायडा नवनाथ लोंढे रा. कारकेल ता. बारामती यांनी दिली आहे.
No comments