खासदार रणजितसिंह यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी संपन्न ; रणजितसिंह यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
MP Ranjitsingh's birthday is celebrated with social activities
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ४४ व्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांच्या व हितचिंतकांच्या सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. नियोजित कार्यक्रमानुसार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर पुण्यावरून विविध सामाजिक संघटनेंच्या शुभेच्छांचा स्वीकार करत दुपारी अंदोरी येथील खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नवीन रिगल फार्मफ्रेश प्रा.लि.या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने ठेवलेल्या वाढदिवस शुभेच्छांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून, पुढे फलटण ग्रामीण व शहरातील कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी ठेवलेल्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावून, विद्यानगर येथील राजभवन या निवासस्थानी माढा लोकसभा मतदार संघातील हितचिंतक व भाजपा कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिवसभर फोन व प्रत्यक्ष भेटून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
खा.रणजितसिंह ना.निंबाळकरांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शहा,केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भाजप राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी राज्यातील व देशातील अनेक खासदार आमदार व अन्य पदाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी,मित्र, कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
दरम्यान दुपारी आपल्या राजभवन या येथील निवासस्थानी फलटण शहर व तालुक्यासह संपूर्ण माढा मतदार संघातून आलेले भाजपा पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या शुभेच्छा त्यांनी स्विकारल्या, गुच्छ, बुके, हार, पुस्तके, भेट वस्तू देवून दादांची प्रत्यक्ष भेट घेवून शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे येथील निवासस्थान 'राजभवन' बाहेर या सर्वांनी मोठी गर्दी केली होती. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते यामध्ये मलटण येथील स्वयंभू त्रीजटेश्वर महादेव मंदिरात खासदार मलटणकर मित्रमंडळाच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसा दिनी महादेवाला अभिषेक घालून खा.रणजितसिंह ना.निंबाळकरांना दीर्घायुष्य लाभावे ही प्रार्थना केली,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मा.नगरसेवक अनुप शहा,निलेश चिंचकर,प्रसाद पाटील,सागर शहा ,यांच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्ररोग तपासणी शिबिरास आयोजित शिबिरास ३००० हजार रुग्णांची तपासणी करून १५०० चष्मे मोफत वाटप करण्यात आले व १७५ रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी निवड करण्यात आली असून त्यांना पुणे येथील एच.व्हि देसाई आय इन्स्टिट्यूट मध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी तालीम मंडळ व बबलू मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास २५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले १०० महिलांनी रक्तदान शिबिरास उपस्थित दर्शवली त्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने २५ महिलांची हिमोग्लोबिन प्रमाण व्यवस्थित आढळल्याने त्यांचे रक्तदान स्वीकारण्यात आले ,भाजपा युवा मोर्चा शहर व निकोप हॉस्पिटल येथे कै.हिंदुराव नाईक निंबाळकर कोवीड १९ लसीकरण शुभारंभ झाला व त्याचबरोबर सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले शिबिरास असंख्य रुग्णांनी लाभ घेतला तुलसी एक्सीडेंट हॉस्पिटल कोळकी येथील डॉ.आगवणे यांनी अस्थिव्यंग व त्वचारोग शिबिराचे आयोजन केले होते यातही बरेच गरजू रुग्णांनी लाभ घेतला.मा.नगरसेवक सचिन अहिवळे मित्र मंडळाच्या वतीने,उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप,अहद सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मैहबूबभाई मेटकरी व रियाजभाई इनामदार मित्र मंडळ यांच्या वतीने मदरसा व उर्दू शाळेत मुलांना व ताथवडा आश्रम शाळेतील मुलांना खाऊ व फळे वाटप,कोळकी येथील आश्रम शाळेत संदीप नेवसे मित्र मंडळाच्या वतीने खाऊवाटप बुध ता.माण येथील सौ पाटोळे यांच्या आत्मगिरी आश्रम शाळेत कु.ताराराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने धान्य वाटप व खाऊ वाटप,भाजप फलटण तालुका महिला आघाडीच्या वतीने महानुभव पंथ श्री कृष्ण मंदिर येथील अनुयायांना फळे व धान्य वाटप,सौ.गीता पवार सोमवार पेठ यांच्यावतीने सोमवार पेठेतील गरजू महिलांना साडी वाटप, सिराज भाई मित्र मंडळ तडवळे यांच्या वतीने बडेखान येथे वृक्षारोपण व खराडेवाडी येथील आश्रमशाळेत खाऊ वाटप किसान मोर्चा फलटण शहर च्या वतीने प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल फलटण येथे मुलांना वह्या व खाऊ वाटप,असे अनेक विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले.
No comments