युक्रेन मध्ये अडकलेला शेवटचा भारतीय सुरक्षित होईपर्यंत माझी सेवा देईन - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात काम करण्याची संधी देण्याची खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ फेब्रुवारी : युक्रेन आणि रशियामधील सद्य युद्ध स्थितीमुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी तन - मन - धनाने काम करण्याची इच्छा व्यक्त करीत, मला भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळाचा सदस्य करावे. मी घटनास्थळी पोहोचतो आणि तिथला शेवटचा भारतीय सुरक्षित होईपर्यंत माझी सेवा देतो अशी विनंती माढा लोकसभा मतदार संघातील युवा लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान, केंद्रीय विदेश मंत्री यांना केली आहे.
भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांना आपल्या देशात परत आणण्याच्या या उदात्त कार्यात सेवा रुपाने काम करण्याची संधी भारतीय शिष्टमंडळ सदस्य म्हणून आपल्याला देण्यात यावी. युक्रेनमध्ये पोहोचल्यानंतर देशातील या तरुण नागरिकांना मदत करण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करुन, सरकारी अधिकारी आणि यंत्रणांना शक्य तितक्या सक्रियपणे मदत करण्याची आपली इच्छा आहे. देशाची सेवा करण्याची ही संधी जर आपल्याला दिली तर लोकप्रतिनिधी या नात्याने देशाची सेवा उत्तम करीन याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पत्रामध्ये स्पष्ट पणे नमूद केली आहे.
सर्व भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून घटनास्थळी पोहोचल्या पासून तेथील शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करीत आपल्यासाठी देश प्रथम आहे, देश पुन्हा नाही, तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठविल्या जाणार्या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेश मंत्री एस. जयशंकर यांच्या कडे केली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये परत आणण्याच्या या उदात्त कार्यात सेवा रुपाने काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्राद्वारे पुन्हा पुन्हा केली असून त्यांचे देशप्रेम आणि भारतीय विद्यार्थी व नागरिक यांच्या विषयीची भावना त्यामधून व्यक्त होताना दिसून येत आहे.
No comments