प्रशासनाच्या संपर्कासाठी गावात वास्तव्य असलेला शासकीय कर्मचारी म्हणून पोलिस पाटील हे अत्यंत महत्वाचे पद - डॉ. शिवाजीराव जगताप
फलटण : कायदा सुव्यवस्था नियंत्रण आणि प्रशासनाच्या संपर्कासाठी गावात वास्तव्य असलेला शासकीय कर्मचारी म्हणून पोलिस पाटील हे अत्यंत महत्वाचे पद असून फलटण तालुक्यात पोलिस पाटील चांगले काम करीत असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
फलटण तालुक्यात ३५ गावातील पोलीस पाटील पदे रिक्त असून सदर रिक्त पदे भरतीसाठी दि. २२ फेब्रुवारी रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होईल आणि दि. १३ मार्च रोजी लेखी व त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येणार असून त्यापूर्वी आज (गुरुवार) या ३५ गावातील पोलिस पाटील पदाची आरक्षणे येथील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतीक भवनात सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली, त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते, यावेळी तहसीलदार समीर मोहन यादव, काही विद्यमान पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिस पाटील पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून राखीव पदांसाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर पदे रिक्त रहातात त्यासाठी काही तरतुदी आणि वरिष्ठांशी चर्चा करुन जेथे उमेदवार उपलब्ध होणार नाहीत त्यासाठी आरक्षण बदलून घेता येत असेल तर त्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसून प्रयत्न करण्याचे सूतोवाच करीत शक्यतो एकही पद रिक्त राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी दिले आहे.
आजच्या आरक्षण सोडतीद्वारे तालुक्यातील ३५ गावांसाठी पोलिस पाटील पदांची आरक्षणे निश्चित करण्यात आली, ती खालीलप्रमाणे -
अनुसूचित जाती महिला : पवारवाडी, निंभोरे, खुंटे.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण : होळ, खटकेवस्ती, कुरवली खु||, सासकल, अलगुडेवाडी, भाडळी बु||.
अनुसूचित जमाती महिला : खामगाव, ठाकुरकी, फडतरवाडी.
विशेष मागास प्रवर्ग महिला : जाधववाडी (फ).
विमुक्त जाती (अ) सर्वसाधारण : तावडी, धुळदेव, मानेवाडी.
भटक्या जमाती (ब) महिला : वडगाव.
भटक्या जमाती (क) महिला : ढवळ.
भटक्या जमाती (क) सर्वसाधारण : पाडेगाव.
इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण: शिंदेमाळ, कोळकी, रावडी खु||, कापशी, चांभारवाडी.
इतर मागास प्रवर्ग महिला : फरांदवाडी, विडणी.
भटक्या जमाती (ड) महिला : तरडफ, कोराळे, कोपर्डे.
आर्थिकदृष्टया दुर्बल सर्वसाधारण : झडकबाईवाडी, काशीदवाडी.
No comments