गुणवरे येथे चक्री जुगार अड्ड्यावर छापा ; १ लाख २८ हजरांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ - गुणवरे ता . फलटण येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी चक्री मटका जुगार अड्डयावर छापा मारून १ लाख २८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुणवरे येथे सागर विठ्ठल जाधव हा त्याच्या खोलीत चक्री मटका जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती मिळाल्याने, ग्रामीण पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना तेथे सागर विठ्ठल जाधव रा. गुणवरे ता. फलटण , रोहीत पवार ( पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही ) प्रशांत प्रकाश लंगुटे वय रा. बरड ता. फलटण व अन्य चार इसम बेकायदा चक्री नावाचा मटका जुगार टेबल वरील आकडयावर लोकांच्याकडून पैसे पैजेवर घेवून, मटका कॅम्प्युटरच्या सहाय्याने घेत असताना मिळून आले. पोलिसांनी तेथून त्यांच्याकडील १ लाख २७ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य, ७६० रुपये रोख असा एकुण एक लाख २८ हजार ४६० रुपयांचा ऐवज घटनास्थळावरुन जप्त केला आहे. या प्रकरणी वरील तीघांसह अन्य अनोळखी चार जणांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
No comments