Breaking News

खुंटे विकास सोसायटी निवडणूकीत राजे गट पुरस्कृत पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

Raje group wins Khunte Vikas Society election

     फलटण   : खुंटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., खुंटे, ता. फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकित राजेगट पुरस्कृत भैरवनाथ परिवर्तन पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

     राजेगट पुरस्कृत भैरवनाथ परिवर्तन पॅनेलने सर्व १३ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते, त्यापैकी १२ उमेदवार निवडून आले. सर्व विजयी उमेदवारांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

    एकूण ६०० मतदारांपैकी ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी ३१ मते अवैद्य ठरविण्यात आली असून ४९७ मते वैध ठरविण्यात आली आहेत.

     विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे - 

     सर्वसाधारण प्रवर्गातून अविनाश पांडुरंग खलाटे २९९, चंद्रकांत बबन खलाटे २८६, दीपक शिवाजी खलाटे २७३, धीरज दिलीपराव खलाटे २७३, दादा किसन काळे २५१, शिवाजी गोविंद गारडे २३९,  राजेंद्र रामदास खलाटे २३६. महिला राखीव मतदार संघातून सौ. छाया त्रिंबक खलाटे २७५, सौ. सुरेखा दत्तात्रय खलाटे २६४. विशेष मागास प्रवर्गातून संग्राम पोपट येळे २९१. इतर मागास प्रवर्गातून शिवाजी सिताराम भोंगळे २७६. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुधाकर साहेबराव माने २७०.

     विधान परिषद सभापती श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर, आ.  दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव खलाटे, दिलीपराव खलाटे, बाळासाहेब खलाटे, जयवंतराव काळे,  सदाशिव खताळ, विलासराव काळे, नानासाहेब महादेव खलाटे, संग्राम खलाटे, शरद खलाटे, डॉ. कालिदास खलाटे यांच्या सह सभासद शेतकऱ्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments