मलठणमधील रस्त्याची कामे सुरू करा अन्यथा दि. १० फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी - श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रोडची अवस्था दयनीय झाली आहे तसेच मलठणमधील अंतर्गत दोस्ती खराब झालेले आह, तरी दि. ०९/०२/२०२२ तारखेपर्यंत रस्त्याची कामे सुरु करण्यात यावीत. अन्यथा मलठणमधील सर्व मा.नगरसेवक व नागरिक फलटण नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन माजी नगरसेवकांनी दिली आहे.
माजी नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेचा २०१६ ते २०२१ हा पंचवार्षिक कालावधी संपलेला आहे व प्रशासनाने प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. गेली ५ वर्षात आम्ही नगरसेवक १) श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर, २) श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, ३) सौ. मिना कृष्णात नेवसे, ४) सौ. मदलसा संभाजी कुंभार, ५) श्री. सचिन रमेश अहिवळे, ६) श्री. अशोक जयवंत जाधव यांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनसुद्धा निव्वळ राजकीय हेतूने नगर परिषदेतील सत्ताधारी पार्टीने मलठण मधील विकास होवू दिला नाही व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणेत आले आहे. वास्तविक मलठणमधील नागरिक मालमत्ताधारक दरवर्षी वेळेवर नगर पालिकेचा संकलीत कर व पाणीपट्टी भरत आले आहेत. तरीसुद्धा राजकीय आकसापोटी काही मंडळींनी मलठणमधील कामे होण्यास विरोध केला. जे नागरिक नगर परिषदेचा कर नरत आहेत. त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणे हे नगर पालिकेचे काम असून ते न केल्यामुळे मलठण मधील नागरिकांना सपत्नीक वागणूक दिली गेल्याचे दिसत आहे.
No comments