सनी अहिवळे यांनी झाडे लावण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ फेब्रुवारी - कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे झाडांचे महत्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे. वृक्ष तोडीमुळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवणार असून, सनी अहिवळे यांनी १००० झाडे लावण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद असल्याचे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले
मंगळवार पेठ फलटण येथे वृक्षारोपणाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सनीदादा अहिवळे, सुधीर अहिवळे उपस्थित होते. फलटण शहरांमध्ये एक हजार झाडे लावण्याचा संकल्प सनीदादा अहिवळे यांच्या कडून करण्यात आला आहे. याची सुरुवात आज मंगळवार पेठ येथून करण्यात आली.
यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, या वृक्षरोपण संकल्पामध्ये फलटण शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त झाडे लावावीत व फलटण शहराला हरित करावे व भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून प्रयत्न करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी सनी अहिवळे यांनी सांगितले की, भविष्यात कोरोना किंवा अन्य एखादे संकट येउ नये म्हणून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरांमध्ये एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यापुढे नगरपालिका हद्दीतील कोणतीही परवानगी अथवा शासकीय कागदपत्रे देताना एक झाड लावण्याची विनंती करावी असे मत अहिवळे यांनी व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब काकडे, सुधीर अहिवळे सर, सनी काकडे, आप्पा काकडे, हर्षल लोंढे, संग्राम अहिवळे, प्रशांत अहिवळे, जय रणदिवे, शिवा अहिवळे, सिद्धार्थ अहिवळे, विकी काकडे, अविनाश सरतापे, सनी मोरे, मंगेश जगताप, सागर अहिवळे, राकेश माने, रवी गायकवाड यांची उपस्थिती होती.
No comments