१५ % राखीव निधी दलित वस्तीमध्येच वापरा : वंचीत बहुजन आघाडीची मागणी
फलटण -: फलटण तालुक्यातील बौद्ध वस्तीसाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १५ टक्के राखीव निधीचा योग्य पद्धतीने वापर करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांना वरील विषयाचे निवेदन देताना वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, अड. जीवन पवार, युवक अध्यक्ष रणजित मोहिते, विकास मोरे, विपुल सोनवणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यामधील अनेक गावांमध्ये दलीत वस्तीचा १५ टक्के राखीव निधी व्यवस्थितपणे न वापरता तो इतर ठिकाणी वापरला जात असल्याचे निदर्शनास आणून देत तो निधी बौद्ध वस्तीतच वापरण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
मिरगांव, ता. फलटण येथे बौद्ध वस्तीत २ वर्षांपूर्वी थंड पाण्याचा कुलर बसविण्यात आला आहे, परंतू अद्याप त्यामधून पाणी मिळाले नाही, सदर कुलर बंद अवस्थेत आहे. या कुलरला आता भंगार बाजारात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही, तरी शासनाने लवकरात लवकर कुलर चालु करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
No comments