अवजड वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ फेब्रुवारी - फलटण लोणंद रोड वर सकाळी प्रातर्विधीसाठी चाललेल्या वृद्धेस अज्ञात अवजड वाहनाने जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात अवजड वाहनाचा चालक फरार झाला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२३ /०२/२०२२ रोजी सकाळी ६:५५ वाजण्याच्या पूर्वी फलटण ते लोगांद जाणाऱ्या रोडवर, संत ज्ञानेश्वर पालखी फलटण मध्ये प्रवेश करते तेथे, स्वामी सीट कव्हर समोर, वंचलाबाई बाबुराव कदम वय ८० वर्षे या लोणंद बाजुकडे उघड्यावर प्रातविधीकरीता चालत जात असताना कोणत्यातरी अज्ञात मोठ्या अवजड वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता, हयगयीने अविचाराने चालवुन, वंचलाबाई यांना जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात वंचालाबाई यांच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर पडलेले होते. त्यातच वंचलाबाई ठार झाल्या असल्याची फिर्याद अमित बाळासो कदम रा. मलठण, फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
No comments