कोळकी येथील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात चूक दुरुस्ती
दि. ०७/०४/२०२२ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात बापू नामदेव शिंगाडे रा. शिंगणापूर ता.माण जि.सातारा व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांच्या विरुदध गुन्हा दाखल केला असून, सदर फिर्यादीबाबत माझे अधिकचे सांगणे की, “मी फिर्याद देते वेळी सन-२०२१ मध्ये बापू शिंगाडे यांने आपण खरेदी करीत असलेल्या जमीनीस रस्ता नाही असे सांगुन रस्ता देण्यासाठी शेजारील शेतकरी शंकर दत्तोबा पखाले हा तयार आहे, तरी जमीनीस रस्ता मिळून आल्यास जमीन एन.ए. होईल व त्यांनतर जमीनीचा व्यवहार करता येईल असे सांगितले. त्यामुळे आम्ही व बापू शिंगाडे असे शेतकरी शंकर पखाले यांस भेटलो व रस्ता देण्यासाठी शंकर पखाले यांनी १० लाख रूपयाची मागणी केली असे लिहून दिले होते, परंतु आमची शेतकरी शंकर दत्तोबा पखाले यांच्यासोबत रस्त्याबाबतच्या व्यवहाराची कोणतीही बोलणी झाली नव्हती, माझ्या कडून शंकर दत्तोबा पखाले असे नाव घाईघडबडीत व चुकून लिहले गेले होते, त्यांचा या व्यवहारामध्ये काहीएक संबंध नाही. आमची व बापू शिंगाडे यांची रस्त्यासंदर्भात सिद्धू पखाले यांचेशी बोलणी झाली होती. सिद्धू पखाले हे सध्या मयत झालेले आहेत.” परंतु नंतर "आम्हाला समजले कि, बापू शिंगाडे यांनी जमीनीस रस्ता मिळवून देवून जमीन एन.ए. करून, ती खरेदी करून देतो असे आम्हास सांगुन, जे १० लाख रूपये चेकने स्विकारले होते, त्या रस्त्यासंदर्भात बापू शिंगाडे याने पुढे कोणत्याही शेतकऱ्याशी व्यवहार केला नाही तसचे जमीनीस रस्ता मिळवून दिलेला नाही. असा पुरवणी जबाब अभिजीत जरिचंद सुरवसे रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण यांनी पोलीस ठाण्यात दिला आहे.
No comments