Breaking News

बैलगाडा शर्यतीत वाद ; २० जणांवर गुन्हा दाखल

Disputes in bullock cart races; Crimes filed against 20 persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पवारवाडी ता. फलटण येथे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती प्रसंगी बैलगाडी शर्यतीत सहभागी करण्याबाबत आयोजक व स्पर्धक व प्रेक्षक यांच्यामध्ये वाद झाला, या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून एकूण २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १५/०४/२०२२ रोजी सकाळी ०८.०० वा. पासून पवारवाडी, ता. फलटण येथील जमीन गट नं. ५७ मधील विनायक सदाशिव मोहिते यांच्या शेतजमीनीमध्ये पवारवाडी गावच्या जोतिर्लिंग यात्रेनिमित्त नितीन जगन्नाथ वरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक  सोनवणे, स.पो.फौ. सूर्यवंशी, पो.हवा. शेळके, पो.कॉ.अवघडे, होमगार्ड धिरज राजेंद्र भोसले, आकाश राजकुमार सावंत व आकाश राजाराम घाडगे असे बंदोबस्ता करीता सदर ठिकाणी सकाळी ०८.०० वा. पासून कर्तव्यावर हजर होते.

     सदर बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी प्रशासनाकडुन रितसर परवानगी घेतल्यामुळे फलटणच्या नायब तहसिलदार श्रीमती दिपाली संपतराव बोबडे मॅडम, आसूचे मंडलाधिकारी श्री. कोकरे व चालक भिसे हे देखिल बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित होते.

    बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एक इसम त्याचे नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी सदर बैलगाडा शर्यतीचे आयोजक नितीन जगन्नाथ वरे रा. पवारवाडी, ता. फलटण यांना आग्रह धरत होता. त्यास नितीन जगन्नाथ वरे यांनी नकार देताच, त्या दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. त्यांचा वाद पाहून बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले व बैलगाडा शर्यतीचे आयोजक असे दोन्ही बाजूचे लोक त्या भांडणामध्ये पडुन आरडाओरडा करीत एकमेकांना धक्काबुक्की करून करुन सार्वजनिक शांतता बिघडवत असताना योग्य वेळी अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस स्टाप यांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन आरोपी नामे १) नितीन जगन्ना वरे २) सुहास आनंदराव पवार ३) विकास ज्ञानदेव वरे४) चंद्रकांत दत्तात्रय पवार ५) अजित पोपटराव हजारे ६) राजेंद्र भानुदास पवार ७) सुधीर मारुती पवार ८) राहुल जगन्नाथ वरे ९) धनराज बाळासाहेब पवार १०) वैभव महादेव पवार ११) चांगदेव वसंत चव्हाण १२) गणेश संभाजी चव्हाण १३) शिवाजी रामचंद्र कदम १४) बाळु सोपान जगदाळे १५) राजेंद्र संपत चव्हाण सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण १६) तानाजी मधुकर गुरव १७) दत्तात्रय भाऊसो गावडे१८) किशोर भगवान भोसले १९) बाळासाहेब नारायण यादव २०) हनुमंत महादेव खारतोडे सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण जि. सातारा यांना ताब्यात घेवून सदर आरोपी विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २८९/२०२२ भादविस कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व आरोपीस ताब्यात घेवून आरोपी सी.आर.पी.सी. ४१ अ (१) प्रमाणे नोटीस देवुन सोडण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली एस. एस. सुर्यवंशी सहा. पोलीस फौजदार हे करीत आहेत.

No comments