निंभोरे येथील आदिराज रणवरे याची सैनिक स्कूल साठी निवड
![]() |
दिराज रणवरे याचे अभिनंदन करुन त्याला पेढ्याचे पॅकेट देताना श्रीमंत रामराजे शेजारी मुकुंदराव रणवरे. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : जिल्हा परिषद प्रा. शाळा, निंभोरे, ता. फलटणचा विद्यार्थी चि. आदिराज संतोष रणवरे याची सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाली असून या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
चि. आदिराज रणवरे याने विशेष प्राविण्यासह जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत असून प्रा. शाळा निंभोरेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांसह ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निंभोरे ग्रामपंचायत सरपंच सौ. कांचनताई निंबाळकर, उपसरपंच आणि श्रीमंत रामराजे यांचे स्वीय सहाय्यक मुकुंदराव रणवरे यांनी चि. आदिराज रणवरे याचे अभिनंदन केले आहे.
No comments