Breaking News

फलटण आगारातून एस. टी. प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू

ST passenger traffic from Phaltan depot resumed smoothly

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) कर्मचारी संपानंतर  फलटण आगारातील प्रवासी वाहतूक टप्या टप्प्याने सुरळीत होत असून प्रवाशी वर्गाला दिलासा देण्यात आगार व्यवस्थापक व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

     फलटण आगारातून सकाळी ६ पासून रात्री ८.३० पर्यंत फलटण - बोरीवली (मुंबई) मार्गावर १३, फलटण - दादर  (मुंबई) मार्गावर सकाळी ६.३० वाजता १ आणि फलटण - मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी ११.३० व रात्री १० अशा २ एस. टी. बसेस नियमीत सुरु करण्यात आल्या आहेत.

   फलटण - स्वारगेट (पुणे) मार्गावर सकाळी ६.३० पासून दर अर्ध्या तासाने, फलटण - सातारा मार्गावर  सकाळी ६.३० पासून दर तासाने, फलटण - बारामती मार्गावर सकाळी ६.१५ पासून दर अर्ध्या तासाने एस. टी. बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

     त्याचप्रमाणे सकाळी ७.४५ वाजता फलटण - मलकापूर, सकाळी ८.४५ वाजता फलटण - मलकापूर, सकाळी ६.३०  फलटण - अक्कलकोट, सकाळी ६.३० फलटण - ईचलकरंजी, सकाळी ६.३० फलटण - ज्योतीबा, सकाळी ५.४५ फलटण - शिर्डी, सकाळी ८ वाजता फलटण - सांगली,  सकाळी ८.४५ फलटण - सांगली या मार्गावर फलटण आगारातून एस. टी. बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

     फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे येणारे विद्यार्थी,  औषधोपचारासाठी येणारे वृद्ध स्त्री - पुरुष, अंध, अपंग वगैरे समाज घटकांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून पूर्वीप्रमाणे सर्व बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी होत आहे. त्याकडे एस. टी. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

No comments