टु डी इको तपासणी शिबीराचा 111 लाभार्थी बालकांनी घेतला लाभ
सातारा: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियासाठी संदर्भित केलेल्या बालकांचा टु डी इको तपासणी शिबीराचा एकूण 111 लाभार्थी बालकांनी लाभ घेतला. या शिबीरामधून 49 लाभार्थी बालके हृदय शस्त्रक्रियासाठी संदर्भित करण्यात आली. या सर्व हृदय शस्त्रक्रिया श्री. सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर ॲण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक कार्डीयाक स्किल्स, खारघर, नवी मुंबई येथे पूर्णपणो मोफत होणार आहेत.
या शिबीराप्रसंगी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभष कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. राहूल खाडे, डॉ. भास्करर यादव, डॉ. राजकुमार जगाताप, डॉ. अरुधंती कदम, डॉ. उल्का झेंडे, आरबीएसके व डीईआयसी विभागामधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments