बजरंगराव कदम - जहागीरदार यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ : गिरवी, ता. फलटण येथील ज्येष्ठ नागरिक बजरंगराव शंकरराव कदम - जहागीरदार यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) सकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्र मंडळी आणि गिरवी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार स्व. चिमणराव कदम हे त्यांचे कनिष्ठ बंधू होते.
No comments