Breaking News

मंत्रिमंडळ निर्णय - ग्रामीण भागात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार

Cabinet decision - Krantijyoti Savitribai Phule Gharkul scheme will be implemented in rural areas

    मंत्रिमंडळ निर्णय दि. २९ जून २०२२ - राज्यातील ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राज्यातील ग्रामीण भागात 20 लाभार्थ्यांकरिता एक वसाहत निर्माण करण्यात येईल.  प्रत्येक वसाहतीस अंदाजे 88.63 लाख खर्च येईल.  या वसाहतींना सर्व नागरी सुविधा असतील.  10 कुटुंबांकरिता प्रति वसाहतीसाठी अंदाजे 44.31 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी 1.20 लाख रुपये निधी अनुज्ञेय असेल.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थी निवडेल.  या आर्थिक वर्षात वसाहतीकरिता तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी 30 कोटी रुपये इतका निधी लागेल.

No comments