बरड गावच्या सरपंचासह कूटूंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल ; ५ दिवस पोलीस कोठडी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : घरासमोरील रस्ता लवकर पुर्ण करुन द्या, असे कॉन्ट्रॅक्टरला सांगितल्याने मारहाण करुन घरातील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी बरड ता. फलटण येथील महिला सरपंचासह त्यांच्या कूटूंबातील एकुण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही संशयीतांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, बरड ता. फलटण येथील राजेंद्र ज्ञानदेव गावडे वय ५१ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावडे यांनी त्यांच्या घरासमोर चालु असणाऱ्या रस्त्याच्या कामावरील कॉन्ट्रॅक्टर यांना आमचे घरासमोरचा रस्ता पण लवकर करून घ्या, असे सांगितल्याचा राग मनात धरून चिडुन जावुन त्यांना संतोष पांडुरंग गावडे वय ४०, कृष्णात पांडुरंग गावडे वय ३८, तृप्ती संतोष गावडे ( सरपंच बरड), वय ३६, पांडुरंग बाबा गावडे, वय ६०, शकुंतला पांडुरंग गावडे वय ५८ सर्व रा. बरड ता. फलटण यांनी सोमवार ता. १३ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घरात जावून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राजेंद्र गावडे यांना व त्यांची पत्नी हेमलता राजेंद्र गावडे, दोन मुली प्रियंका राजेंद्र गावडे,प्रतिक्षा राजेंद्र गावडे यांना मारहाण करून दुखापत करुन घरातील साहित्याचे व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राचे नुकसान केले आहे. लहान मुलगी प्रतिक्षा राजेंद्र गावडे हिने जिवाच्या भीतीने घरातून पळून बाहेर जाऊन आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी वरील पाचही जणांवर विविध कलमांन्वये फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाचहीजणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
No comments