Breaking News

प्रधानमंत्री मातृत्व अभियानांतर्गत 5 हजार 643 गरोदर मातांची तपासणी

Examination of 5 thousand 643 pregnant mothers under the Prime Minister's Maternity Campaign

      सातारा  : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील 5 हजार 643 गरोदर मातांची खासगी वैद्यकीय तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर सर्व उपचार मोफत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

  प्रामुख्याने 1 हजार 810 गरोदर मातांची मोफत सोनाग्राफी साठी संदर्भीत करण्यात आले आहे. योजनेपासून एकही गरोदर माता तपासणी व उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षित मातृत्व हे मातृत्व आरोग्य सुधारण्याचे व माता मृत्यु कमी करण्याचे एक प्रभावी साधन असल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला संपूर्ण देशामध्ये राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांना प्रसुतीपूर्व काळात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यात येत असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे उद्दिष्ट हे गरोदर पणातील दुसऱ्या व तीसऱ्या टप्यातील सर्व मातांना उच्च दर्जाची प्रसुती पूर्व सेवा, तपासण्या व समुपदेशन करणे हा या अभियांनाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत 5 हजार 643 गरोदर मातांची खाजगी वैद्यकीय तज्ञांमार्फत  तपासणी करण्यात आली असून 1 हजार 42 अतिजोखमीच्या गरोदर मातांची तपासणी करुन त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले आहेत.

No comments