Breaking News

पालकमंत्र्यांकडून फलटण तालुक्यातील पालखी तळ व व्यवस्थेची पाहणी

फलटण येथील पालखी तळाची पाहणी करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपकराव चव्हाण
Guardian Minister inspects Palkhi base and arrangement in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात दि. ३० जून रोजी आगमन होत असून,  फलटण शहरात २ दिवस व तालुक्यात एकूण ४ दिवस मुक्काम असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी फलटण तालुक्यातील पालखी तळ,  सकाळची न्याहरी, दुपारचा विसावा आदी ठिकाणांची व तेथील व्यवस्थेची वीज, पाणी, रस्ते, आरोग्य वगैरे सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल, जिल्हा फरिषद मुख्यकार्यकारी आधिकारी तथा प्रशासक विनय गौडा, फलटणचे प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलिस उप अधिक्षक तानाजी बारडे, तहसिलदार समिर यादव, गटविकास अधिकारी आमिता गावडे आदी अधिकारी, वीज, आरोग्य, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

    तरडगाव येथे चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाचे ठिकाण व तरडगाव गावातून पालखी तळाकडे जाणारा पालखी मार्ग व पालखी तळाची पाहणी केल्यानंतर तेथील वीज पाणी आरोग्य सुविधा पालखी ठेवण्याचा ओटा व पालखी तळालगत उभारण्यात येत असलेल्या स्नानगृह व स्वच्छतागृहाविषयी माहिती सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रशांत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून घेतल्यानंतर याबाबी वेळेत पुर्णा करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. 

      फलटण येथील पालखी तळावर असलेली संपुर्ण व्यवस्था पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडून नगरपालीकेने खास तयार केलेल्या नकाशाद्वारे समजावून घेतली. विशेषतः सोहळ्यातील रथा पुढील व रथा मागील दिंड्या, पालखी ठेवण्याची जागा, सुरक्षा विषयक व्यवस्था, पालखी तळावरील वीज पाणी आरोग्य सुविधा या सर्व बाबींची बारकाईने माहिती घेवून कोणत्याही प्रकारे वारकर्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या. 

       वारकरी भावीकांसाठी पालखी तळावर लावण्यात येणारे किराणा व जिवनावश्यक वस्तुंचे स्टॉल याचे नियोजणाबाबत माहिती घेवून कोणत्याही परिस्थितीत त्याचा वाहतूकीस व पालखी तळावर दर्शनासाठी येणार्या भाविकांना अडथळा होणार नाही याविषयी काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. पालखी सोहळा मुक्काम दोन दिवस असल्याने स्वच्छतागृहाची व्यवस्था व सोहळ्याचे प्रस्थान झाल्यावर पालखी तळ व परिसराची स्वच्छता याविषयी करण्यात आलेल्या नियोजणाची माहिती घेवून त्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. गेल्या दोन वर्षांनंतर कोरोनाच्यि प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा काढला गेला नाही. या वर्षी वारकरी भावीकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवुन त्यानुसार संपुर्ण नियोजन करण्याच्या सुचना देतानाच राज्याच्या अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आळंदी-पंढरपूर व सोहळ्याच्या मार्गावर कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा नसला तरी शासन व प्रशासन त्याबाबत दक्ष आसून वैद्यकीय यंत्रणेला स्पष्ट सुचनना देण्यात आल्या आहेत. वारकरी भावीख व अन्य घटकांननी त्या बाबत योग्य काळजी घेवून शासन व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

No comments