आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने जिंकले रौप्य पदक ; संघात फलटण व माण तालुक्यातील खेळाडूंचा होता सहभाग
![]() |
पुणे आंतरराष्ट्रीय विमान तळावर उजवी कडून रोहित जावळे कु. ऋतुजा पिसाळ, कु. अश्विनी कोळेकर, कु. वैष्णवी फाळके आणि रोहित कारखानीस. |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : डब्लिन, आयर्लंड येथे दि. १९ ते २६ जून दरम्यान संपन्न झालेल्या ५ व्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले, या स्पर्धेतील भारतीय संघाची कर्णधार वैष्णवी फाळके आणि संघातील अन्य खेळाडू अश्विनी कोळेकर, ऋतुजा पिसाळ व काजल आटपाडकर यांचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हॉकी महाराष्ट्र संघटना सचिव मनोज भोरे, रोहन जावळे, रोहित कारखानीस यांनी स्वागत केले.
कर्णधार वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ या फलटण तालुक्यातील तर अश्विनी कोळेकर व काजल आटपाडकर या माण तालुक्यातील आहेत. या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
No comments