कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहोळा शुक्रवार दि. १ जुलै रोजी पुण्यात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : कृषी महाविद्यालय पुणे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे संघटनेचा ३४ वा स्थापना दिन आणि कृषी दिन याचे औचित्य साधून शुक्रवार दि. १ जुलै रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत कृषी महाविद्यालय पुणेचे आवारातील शिरनामे हॉल येथे खा. श्रीनिवास पाटील (निवृत्त भाप्रसे) यांच्या हस्ते कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष, कृषी पदवीधर किशोर राजे निंबाळकर, जी. डी. लाड सहकारी साखर कारखाना कुंडलचे चेअरमन आ. अरुण लाड, गोकुळ दूध संघ कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष आणि माजी चेअरमन सेंट्रल मिल्क फेडरेशन नवी दिल्ली अरुण नरके, कृषी शिक्षणतज्ञ आणि उपाध्यक्ष डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे बाबासाहेब पवार, आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. बावस्कर यांना त्यांनी केलेल्या त्यांचे उत्तुंग कार्याच्या योगदानाबद्दल कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संघटनेतर्फे दर वर्षी विशेष सेवा कार्य केलेल्या कृषी पदवीधरांना कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा आहे, तथापि कोरोना साथीच्या कालावधीत गेले तीन वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. यावर्षी पुरस्कार वितरण, कृषी दिन आणि संघटना स्थापना दिन संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सर्व कृषी पदवीधर यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. बळवंतराव जगताप, उपाध्यक्ष सर्जेराव जेधे व साखर आयुक्त शेखर गायकवाड, सचिव डॉ. सुरेश पवार आणि डॉ. जनार्दन कदम, खजिनदार दिलीप वाईकर, संचालक सदस्य सुरेश भोंगळे इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments