Breaking News

फलटण नगर परिषद आरक्षण सोडत सोमवार दि. १३ रोजी

Phaltan Municipal Council release lottery for reservation  on Monday On the 13th

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ : फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने उभारण्यात आलेल्या नगर परिषद इमारती मध्ये पहिल्या मजल्यावरील हॉल मध्ये फलटण नगर परिषद आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

    फलटण नगर परिषद अंतीम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यानुसार फलटण नगर परिषद निवडणूक १३ प्रभागातून घेण्यात येणार असून त्यापैकी १२ प्रभागातून प्रत्येकी २ आणि प्रभाग क्रमांक १३ मधून ३ असे एकूण २७ नगरसेवक निवडून द्यावयाचे असून त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

    दरम्यान राज्यातील २१६ नगर परिषद/नगर पंचायत सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. १३ जून रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून त्यावर दि. १५ ते २१ जून  या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली आहे.

    आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या २१६ मध्ये २०८ नगर परिषदा आणि ८ नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्य पदांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येईल. 

    आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या दि. १५ ते २१ जून या कालावधीत दाखल करता येतील. संबंधीत विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील.  

    आरक्षणाची अंतीम अधिसूचना दि. १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No comments