Breaking News

१२ वी परीक्षेचा फलटण तालुक्याचा निकाल ९४.३३ टक्के

संग्रहित छायाचित्र
Phaltan taluka's result of 12th examination is 94.33 percent

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातून या परीक्षेसाठी ३५८१ विद्यार्थी बसले त्यापैकी ३३७८ उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण ९४.३३ % लागला आहे. 

    उत्तीर्णांमध्ये ८२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ८२८ प्रथम श्रेणीत २११७ द्वितीय श्रेणीत आणि ३५१ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. 

फलटण तालुक्यातील २८ पैकी १२ विद्यालयांचे निकाल १०० टक्के

     यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय फलटण, सौ. वेणूताई चव्हाण कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय फलटण, फलटण हायस्कुल फलटण, महात्मा फुले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्याल सासवड, मॉडर्न हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय बरड, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, जाधववाडी, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तरडगाव, जानाई हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय (कॉमर्स) राजाळे, ॶॅम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कुल आदर्की बु||, ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गुणवरे, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कोळकी, सौ. वेणूताई चव्हाण कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (व्होकेशनल) या शाळांचे निकाल १०० % लागले आहेत. 

      फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयातून ५३४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४६५ उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ८७.७ % लागला आहे. ४६५ उत्तीर्णांपैकी २ विशेष प्रावीण्यात २६ प्रथम श्रेणीत २९२ द्वितीय श्रेणीत आणि १४५ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय साखरवाडी कला व वाणिज्य शाखेतून एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८८.६० % लागला आहे. त्यापैकी प्रथम श्रेणीत ११ द्वितीय श्रेणीत ५७ उत्तीर्ण श्रेणीत २ पास झाले आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय फलटण येथून शास्त्र, कला व वाणिज्य शाखेतून ५५४ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ५०९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९१.८७ % लागला आहे. त्यापैकी ४ विशेष प्रावीण्यात ९५ प्रथम श्रेणीत ३५१ द्वितीय श्रेणीत ५९ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयातून शास्त्र, कला व वाणिज्य शाखेतून ८१२ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ७८९ उत्तीर्ण झाले असून विद्यालायाचा निकाल ९७.१६ % लागला आहे. त्यापैकी ३३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २१४ प्रथम श्रेणीत ४८९ द्वितीय श्रेणीत आणि ५३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांतून शास्त्र शाखेचे ७८३ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ७८० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९९.६१ % लागला आहे. त्यापैकी २६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात २४१ प्रथम श्रेणीत ४६२ द्वितीय श्रेणीत ५१ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. 

     जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गिरवी कला शाखेचे ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ३७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९४.८७ % लागला आहे. विशेष प्रावीण्यात १ प्रथम श्रेणीत १६ द्वितीय श्रेणीत १९ उत्तीर्ण श्रेणीत १ विद्यार्थी पास झाला आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी सौ. वेणूताई चव्हाण कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेचे ७३ विद्यार्थी परीक्षेस बसले. ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ५५ द्वितीय श्रेणीत ३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ज्योतिर्लिंग हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पवारवाडी, आसू येथून कला शाखेचे ५० विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ४७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९४ % लागला आहे. त्यापैकी एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत ४५ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे. जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित फलटण हायस्कुल फलटण येथून कला शाखेचे ४० विद्यार्थी परीक्षेस बसले. ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यापैकी ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ३५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जयभवानी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तिरकवाडी येथून कला शाखेचे ४८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ४७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.९१ % लागला आहे. जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथून कला शाखेचे २२ विद्यार्थी परीक्षेस बसले २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल ९०.९० % लागला असून त्यापैकी एक विद्यार्थी विशेष प्रावीण्यात ९ प्रथम श्रेणीत ९ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे. जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोखळी येथून कला शाखेचे १२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १० उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८३.३३% लागला आहे. त्यापैकी ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित श्रीमती प्रेमालाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेचे २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.४२% लागला आहे. त्यापैकी एक विशेष प्रावीण्यात ९ प्रथम श्रेणीत १७ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यातून कला शाखेचे २५ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी ३ विशेष प्रावीण्यात ६ प्रथम श्रेणीत १४ द्वितीय श्रेणीत २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. 

      फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत सरलष्कर बाबाराजे खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालय हनुमंतवाडी येथून कला शाखेचे २२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८६.३६% लागला आहे. त्यापैकी प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत १५ उत्तीर्ण श्रेणीत २ पास झाले आहेत. सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्था संचलित हनुमंतराव पवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय फलटण येथून कला शाखेचे २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९६.२९ % लागला आहे. त्यापैकी १० प्रथम श्रेणीत व १६ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. जयभवानी एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बरड येथून कला शाखेचे ३६ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यापैकी १ विशेष प्रावीण्यात ८ प्रथम श्रेणीत २६ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे.

        फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय जाधववाडी येथून शास्त्र शाखेचे ७१ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २८ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. वेणूताई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तरडगाव येथून कला व वाणिज्य शाखेचे १२ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी १ प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेणीत ५ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित जानाई हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळे येथून कला शाखेचे २३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १६ उत्तीर्ण झाले असून निकाल ६९.५६ % लागला आहे. त्यापैकी ९ द्वितीय श्रेणीत ७ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. तर वाणिज्य शाखेचे सर्व ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या शाखेचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी ३ प्रथम श्रेणीत ५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

       भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी आदर्की बु|| संचलित अँबिशन इंग्लिश मिडीयम स्कुल मधून शास्त्र व वाणिज्य शाखेचे प्रत्येकी २५ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी शास्त्र शाखेचा १ विशेष प्रावीण्यात २२ प्रथम श्रेणीत २ द्वितीय श्रेणीत तर वाणिज्य शाखेचे ३ विशेष प्रावीण्यात १८ प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत. ईश्वरकृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, गुणवरे येथून शास्त्र शाखेचे ३ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. त्यापैकी २ प्रथम श्रेणीत व १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे. सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कोळकी येथून वाणिज्य शाखेचे ३ विद्यार्थी परीक्षेस बसले. ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. तिन्ही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

        फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय साखरवाडी व्होकेशनल (व्यावसायिक) विभागाचे ८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ७५% लागला आहे. त्यापैकी ३ प्रथम श्रेणीत ३ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय फलटण येथून व्होकेशनल (व्यावसायिक) ६३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५६ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ८८.८८% लागला आहे. त्यापैकी ९ प्रथम श्रेणीत ४७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कुल फलटण येथून व्होकेशनल (व्यावसायिक) ६० विद्यार्थी परीक्षेस बसले ५९ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९८.३३% लागला आहे. त्यापैकी १ विशेष प्रावीण्यात २५ प्रथम श्रेणीत ३२ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथून व्होकेशनल (व्यावसायिक) विषयाचे ५९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३७ उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ६२.७१% लागला आहे. त्यापैकी १० प्रथम श्रेणीत २६ द्वितीय श्रेणीत १ उत्तीर्ण श्रेणीत पास झाला आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित वेणूताई चव्हाण कन्याशाळा फलटण येथून व्होकेशनल (व्यावसायिक) विषयाचे ३७ विद्यार्थी परीक्षेस बसले ते सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यापैकी ५ विशेष प्रावीण्यात २१ प्रथम श्रेणीत ११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

No comments