Breaking News

गुटखा विक्रेता व पुरवठादारावर छापा ; १ लाख ३३ हजार रुपयांचा गुटखा जप्त

जप्त केलेल्या गुटख्या समवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी 
Raids on gutka sellers and suppliers; Gutka worth Rs 1 lakh 33 thousand seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जून  - वाजेगाव ता. फलटण येथील  सुरज किराणा जनरल स्टोअर्स दुकानामध्ये गुटख्याची चोरटी विक्री सुरु असल्याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांना समजताच, पोलिसांनी धडक कारवाई करत, वाजेगाव येथील दुकानावर छापा टाकला, तसेच फलटण येथील गुटखा पुरवठादार दुकानदाराच्या गोडाऊन वर छापा टाकून एकुण १,३३,४७१ रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात आयपीसी व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गोडसे यांना त्यांच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मौजे वाजेगाव ता. फलटण गावचे हद्दीत केशव विठोबा गायकवाड रा. वाजेगाव पोस्ट निंबळक ता. फलटण, हा त्याच्या सुरज किराणा जनरल स्टोअर्स दुकानामध्ये गुटख्याची चोरटी विक्री करीत आहे. तरी सदर ठिकाणी छापा घाला असा आदेश दिल्याने, लागलीच फलटण ग्रामीण पोलीस स्टाफने दोन पंचासह छापा टाकला असता, सूरज किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाचे बाहेर असलेले जिन्याखाली एकुण २१७९८/- रुपये किंमतीचा गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने साठा केलेला मिळुन आल्याने पोलीसांनी लागलीच पंचाचे समक्ष जप्ती पंचनामा करून, मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेवून, आरोपी केशव विठोबा गायकवाड वय ६० वर्षे रा. वाजेगाव पोस्ट. निंबळक ता. फलटण, जि. सातारा याचे विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ३९६/२०२२ भा.द.वि.स.कलम ३२८, १८८, २७२, २७३ अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६ चे कलम २६(२) (i) (iv), २७(३)(e),३०(२) (३), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली २०११ चे कलम ३,१,७,२,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.फलटण यांचे कोर्टातून पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करून घेवून सदर आरोपी यास विश्वासात घेवून, आरोपीस सदरचा माल कोणाकडुन खरेदी केला याबाबत विचारपुस केली असता, अटक आरोपी यांने सदरचा गुटखा हा फलटण येथील संतोष दोशी यांच्या दुकानतुन घेवुन गेल्याचे सांगितलेने, आम्ही पोलीस व पंच असे संतोष रतनलाल दोशी यांच्या दुकानात गेलो असता, दुकानाचे शेजारी असलेल्या गोडाऊन मध्ये तसेच आरोपी क्र. २ यांच्या राहते घराचे खाली असलेल्या किराणामालाचे गोडाऊन मध्ये एकुण १,११,६७३/- रूपये किंमतीचा गुटखा मिळुन आला.  सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे. सदर आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करणेत आलेली आहे.

    सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. तानाजी बरडे व  पोलीस निरीक्षक श्री. धन्यकुमार गोडसे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्री.सागर अरगडे, उर्मिला पैदाम, दादासो यादव, अभिजीत काशिद, राजेंद्र गायकवाड, अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी केली आहे.

No comments