श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसा निमित्त सनीदादा अहिवळे मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट ठरेल, असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना दिला होता, या संदेशाची प्रेरणा घेऊन, सनीदादा अहिवळे मित्र मंडळाने मंगळवार पेठ, फलटण येथे वृक्षारोपण करून, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा केला.
मंगळवार पेठ फलटण येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुधीर अहिवळे, विक्रमभैय्या जाधव , सिद्धार्थ अहिवळे, हरीष (आप्पा) काकडे, श्री जे. एस. काकडे, विकी काकडे, सागर राजपाल अहिवळे व इतर नागरिक उपस्थित होते.
No comments