अंकुर विकलांग मतिमंद अंध विकास संस्थेमार्फत फलटण येथे बेरोजगार मेळावा संपन्न
![]() |
मार्गदर्शन करताना श्री दस्तगीर आतार शेजारी सचिव जमशेद पठाण, तुषारभाऊ शिंदे ॲड. जावेद मेटकरी |
Unemployment meet held at Phaltan by Ankur Viklang Matimand Andh Vikas Sanstha
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - अंकुर विकलांग मतिमंद अंध विकास संस्था यांच्यामार्फत, मेटकरी गल्ली, रविवार पेठ, फलटण येथे बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, मेळाव्यात उद्योगधंद्यासाठी लागणारे कर्ज प्रकरण तसेच शासकीय योजना व त्यांना लागणारे कागदपत्र याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
बेरोजगार मेळाव्यास सातारा जिल्ह्याचे सूक्ष्म व मध्यम उद्यामिता विकास चे हेड क्लस्टर श्री दस्तगीरभाई आतार, बारामतीचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री तुषारभाऊ शिंदे, फलटणचे नामवंत वकील व ग्राहक संरक्षण परिषद परिषद महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ॲड. जावेदभाई मेटकरी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इमरान नियाज कुरेशी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे सचिव जमशेद पठाण यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
मेळाव्यात ॲड. जावेदभाई मेटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, संस्थेविषयी माहिती दिली. तसेच छोटे-मोठे उद्योग धंदे करणाऱ्यांना बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी वेळीच सोडविण्यात येतील अशी ग्वाही देतानाच, ज्यांना कुणाला कर्ज प्रकरण करताना अडचणीत येत असतील त्यांनी आमच्या संस्थेची संपर्क साधावा असे आवाहन केले.
बारामतीचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सुशिक्षित बेरोजगार, छोटे-मोठे उद्योग धंदे करणाऱ्या युवकांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्याचे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं व संस्थेस संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रमुख मार्गदर्शक श्री दस्तगीर आतार यांनी, शासनाच्या संपूर्ण योजनाची माहिती दिली तसेच बँकांमध्ये येणाऱ्या अडचणी प्रमुख्याने सोडवण्यासाठी सहाय्यता करण्याचे मान्य केले, तसेच या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती दिली व या बेरोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव जमशेद पठाण यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव जमशेद पठाण यांनी केले. या कार्यक्रमास फलटण नगरपरिषद फलटणचे व्यवस्थापक अधिकारी श्री शिंदे तसेच शिरतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे उपाध्यक्ष युनूस भाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई शेख, इंजिनीयर जावेदभाई शेख तालुक्यातील छोटे-मोठे उद्योग धंदा धंदे करणारे व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी मुस्ताकभाई मेटकरी, बाबा मेटकरी, इरफान शेख यांचे सहकार्य लाभले.
No comments