प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे येथे आषाढी एकादशी दिंडी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात अग्रेसर असणाऱ्या सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , गुणवरे येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्या मध्ये अभंग गायन,भक्तिगीतावर आधारित नृत्य, वृक्षदिंडी सोहळा व त्यावर आधारित नाटक असे कार्यक्रम पार पडले. दिंडी सोहळा कार्यक्रम पार पडल्यावर प्रमुख पाहुण्यांनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण केले .
कार्यक्रमास श्री.रवींद्र येवले (सर), श्री.शंभूराज पाटील,श्री.सुभेदार डूग्गल, श्री.पांडुरंग पवार, श्री.खशाबा जाधव, श्री.आप्पासाहेब वाघमोडे, श्री.रामराव खाडे, श्री. ऋषिकेश गायकवाड तसेच सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार (सर), संस्थेच्या संचालिका आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका आ. प्रियांका पवार, प्रशालेचे पर्यवेक्षक किरण भोसले, समन्वयक सौ. सुप्रिया सपकाळ उपस्थित होते. प्रशालेच्या शिक्षिका सौ.मंजिरी अब्दागिरे आणि सौ.सुप्रिया सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शाळेतील सर्व मुला-मुलींनी आणि शिक्षकांनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. काही विद्यार्थी विठ्ठल, रखुमाई,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत सावतमाळी,संत निवृत्तीनाथ,संत नामदेव,संत एकनाथ,संत चोखामेळा, संत सोपानदेव आणि कोणी वासुदेव,ऋषी बनले अशा विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला. मुलांच्या हातात भगव्या पताका तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
या सोहळ्यासाठी सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या सोहळ्यासाठी भरभरून प्रतिसाद दिला.
No comments