एकल वापर प्लास्टिक वापरास बंदी
सातारा : महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मोकोल उत्पादने ( उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवण ) अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक वापराबाबत नियमन करण्यात आलेले आहे. तसेच एकेरी वापराचे प्लास्टिक (Single Use Plastic) दूर/नष्ट/प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.
शासनाने पुढील प्लास्टिक साहित्यांची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरवर बंदी केली आहे. त्यात आईस्क्रीम कांडया, प्लेटस, कप, ग्लासेस,कटलरी-जसे काटे चम्मच, चाकू स्टॉ, ट्रे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या वगळता सर्व कंपोस्टेबल प्लास्टिक पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग). डिश, बाऊल, कंटेनर (डबे), सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल), मिळाचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका व सिगारेटची पाकिटे यावरील प्लास्टिक आवरण. प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक कांडया, प्लास्टिकचे झेंडे, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे असणे बंधनकारक आहे.
No comments