कै. हणमंतराव पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्याचे सहकार महर्षी कै. हणमंतरावजी पवार (आण्णा) यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार, दि. १७/७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीराम बझार, फलटण येथे श्री. महादेवराव पवार (आबा) माजी चेअरमन, श्रीराम बझार, फलटण यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबीराचा शुभारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजीत केलेला आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन श्रीराम बझार, फलटणचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हा.चेअरमन दिलीपसिंह भोसले, प्र. जनरल मॅनेजर अनंत पाटील व संचालक मंडळाने केले आहे.
No comments