श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन
सातारा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने दि. 19 ते 23 जुलै 2022 या कालावधीत जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा-2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा फुटबॉल असो. च्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील 14 व 17 वर्षे मुले व 17 वर्षे मुली या वयोगटातील 42 संघ सहभागी झाले आहेत.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, आय.सी.आय. बँकेचे व्यवस्थापक शैलेश आपणे, क्रीडा मार्गदर्शक अनिल सातव, मनोज कान्हेरे, राजेंद्र माने, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
No comments