Breaking News

शिरवळ येथे 29 जुलै रोजी रोजगार मेळावा

Employment fair on July 29 at Shirwal

गंधवार्ता करिअर    Gandhawarta Carrer 

     सातारा, दि.22 :   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 वाजता  सातारा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार दि. 29 जुलै 2022 रोजी श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्ती जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

    बेरोजगार उमेदवारांनी http:/orjgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइ्रन नोंदणी करावी. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments