Breaking News

साखरवाडी येथे ६१ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त

Ganja worth 61 thousand 500 rupees seized at Sakharwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१- साखरवाडी ता. फलटण येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून एकुण ६१,५००/- रूपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे व पोलीस पथकाने वेषांतर करून साखरवाडी येथील, गांजा विक्रीची माहिती काढून, सदर ठिकाणी छापा टाकला व गांजा जप्त केला. गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.

    याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गोडसे यांना मौजे साखरवाडी ता. फलटण गावचे चंदाबाई बाळु जाधव ही गांजा विक्री करत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने, त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, सहा. पोलीस फौजदार विलास यादव, पो. हवा. मोहन हांगे, म.पो.ना. रूपाली भिसे , पो.कॉ. निखील गायकवाड  व पो. कॉ. गणेश अवघडे यांचे एक पथक तयार करून, त्यांना सदर ठिकाणी जावुन माहिती घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने, महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे व पोलीस पथकाने वेषांतर करून साखरवाडी भागात जावुन, गोपनिय माहिती घेवुन, साखरवाडी येथील चंदाबाई बाळु जाधव ही तीचे राहते घराच्या आडोशाला बेकायदेशिर चोरटी गांज्याची विक्री करीत असल्याचे समजले. लागलीच पोलीस स्टाफ व दोन पंच असे चंदाबाई बाळु जाधव हीच्या राहते घराचे जवळ गेल्यानंतर तिच्या संशयास्पद हालचाली वरून १६.१५ वा. सदर ठिकाणी छापा घालुन म.पो.उ.नि.धोंगडे व म.पो.ना. भिसे यांनी तिला ताब्यात घेऊन, तिचे कब्जातील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एकुण ६१,५००/- रूपये किमंतीचा गांजा मिळुन आल्याने चंदाबाई बाळु जाधव रा.  साखरवाडी हिचे विरूद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत गु.र.नं. ५१०/२०२२ गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एन.डी.पी.एस) अधिनियम १९८५ चे कलम २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गांजा विक्री धंदयावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी  पो. नि. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी स्वाती धोंगडे म.पोलीस उपनिरीक्षक यांनी तसेच त्यांचे पथकाने, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेची स्थापना झाले पासुन १२ वर्षातील आज पर्यतची अवैध्य गांजा विक्री बाबतची, ही सर्वात मोठी कारवाई केल्याने साखरवाडी परिसरातील नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.  तरी नागरिकांनी अवैध्य धंदयाबाबत माहिती मिळताच संपर्क क्र.८९७५२६८२२०, ०२१६६. २२२५३३ वर माहिती दयावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवणेत येईल असे आव्हान फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

No comments