Breaking News

१० लाख ४३ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त

जप्त करण्यात आलेल्या अवैध गुटख्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत  किंद्रे व इतर 
Illegal gutkha worth Rs 10 lakh 43 thousand seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण शहर पोलिसांनी, झिरपवाडी ता. फलटण येथे अवैध गुटख्याची वाहतूक व वितरण, साठवणूक करत असणाऱ्या इसमास पकडले असून, त्याच्याकडून सुमारे १० लाख ४३ हजार २०० रुपये किंमतीचा ७१९.९ किलो गुटखा, तंबाखूजन्य पान मसाला, सुगंधी तंबाखु जप्त केला आहे. सदर इसमावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, अन्न भेसळ प्रतिबंध अधिनियम व भा.द.वि.स.  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१९/७/२०२२ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या  सुमारास, मौजे झिरपवाडी येथे श्री. योगेश विलास सरगर  रा. रोड नं. ११ संतानगर, मिरज जि. सांगली हा पिकप गाडी क्रमांक एम एच १० ए क्यू ४२३ या वाहनातून, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली उत्पादने विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटखा वाहतूक करताना फलटण शहर पोलिसांना आढळून आला.  पोलिसांनी त्वरित सदरचा माल जप्त करून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर  अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन विभाग सातारा यांच्या मार्फत कारवाई करून, सरगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

योगेश सरगर याच्याकडे १) विमल केसरयुक्त पान मसाला (लाल) - ५४०० पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत रु. १२० असे एकूण किंमत रुपये ६४८०००/- २) विमल केसरयुक्त पान मसाला एकूण ८०० पाकीट प्रत्येक पाकिटची किंमत रुपये १९८ असे एकूण किंमत रुपये १५८४००/-  ३) सुगंधी तंबाखू(लाल) एकूण ३००० पाकीट तसेच एका पुड्यात ३० पाँच व प्रत्येत पुढ्याची किंमत रुपये ३०/- असे एकूण किंमत रुपये ९००००/- ४)  सुगंधी तंबाखू (लाल) एकूण १००० पाकीट तसेच एका पुड्यात ११ पाऊच व प्रत्येक पुड्याची किंमत रुपये २२/- असे एकूण किंमत रुपये २२०००/- ५ ) प्रीमियम आर एम डी पान मसाला एकूण साठा प्रत्येकी २१० ग्रॅमचे १६० कागदी पॅक बॉक्स एकूण वजन ३३ किलो किंमत रु. १२४८००/- असा शासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण साठा ७१९.९  किलो त्याची एकूण किंमत १०,४३,२००/- रुपये आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे,  सातारा,  उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत  किंद्रे, सपोनी नितीन शिंदे,  सहा. पो. फौजदार संतोष कदम, पो. हवा. निलेश काळोखे,  चालक पो.हवा. विजय खाडे,  पो. हवा. चंद्रकांत काकडे ,  पो.हवा. विठ्ठल विरकर, चालक पोना अमृत कर्पे,  पोका अच्युत जगताप,  पो.कॉ. राजेंद्र नरुटे यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला होता.

No comments