Breaking News

फलटण येथे कारगील विजय दिन समारोह आयोजन

Kargil Victory Day Celebration organized at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - जनशक्ती युवा विकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय एकात्मता विचार मंच, लोकमत प्रतिष्ठान या संस्था संघटनांच्या माध्यमातून प्रतिवर्षा प्रमाणे मंगळवार दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता २३ वा कारगील विजय दिन समारंभाचे आयोजन हुतात्मा स्मारक स्तंभ, नागेश्वर मंदिर समोर, फलटण येथे करण्यात येत असून शहर व तालुक्यातील सर्व समाज घटकांनी उपस्थित राहुन सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य संयोजक अमीरखान हिंमतखान मेटकरी यांनी केले आहे.

     कारगील विजय दिन, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे, भारतीय सीमेवर लढताना शहीद झालेले जवान, कोरोना कालावधीत मृत्यू मुखी पडलेले नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करणे व अन्य राष्ट्रीय उपक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येत असून त्यावेळी विविध शासकीय अधिकारी, शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील आणि शहर वासीय नागरिक या कार्यक्रमास नेहमीच उपस्थित असतात आपण उपस्थित राहुन लाभ घ्यावा अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे.

No comments