चंद्रकांत सोबतचे झपाटलेले दिवस ....
दि. ४ नोव्हे.१९८५. हा दिवस फलटण मधील आंबेडकरी चळवळीची सकाळ म्हणावी लागेल. जयंती शिवाय समाज कधीही फारसा इतर सामाजिक कार्यात उत्साहाने भाग घेत नसे. पण सातारा येथून आलेल्या चंद्रकांतने फलटण बाॅडी शो स्पर्धेत क्रमांक पटकवला आणि येथील तरूणांच्यात आनंद-उत्साहाला जणू उधानच आलं. चंद्रकांत सारखी बाॅडी बनवण्याचं नवयुवकांना जनू वेडच लागलं. समाजात कुठेही व्यायामशाळा नव्हती. म्हणून मुलांनी सामाजिक चावडीत एक भींत बांधून व्यायाम शाळा सुरू केली. पण जेष्ठ नेत्यांनी चावडीतील व्यायामाला विरोध केला. मुलांना याचा राग आला अन दलित पॅंथर ४ नोव्हेंबर रोजी भव्यदिव्य उद्घाटनाने सुरू झाली.
रामदास आठवले यांचा पहाडी आवाज, हजरजबाबीपणा आणि जबरदस्त शेरशायरी मुळे फलटण मधील दलितच नव्हे तर सर्वच जाती धर्माचे लोक आठवलेंचे चहातेच झाले. आठवले साहेबांच्या भाषणाच्या प्रभावी शैलीने खऱ्या अर्थाने मी जागृत झालो. कार्यकर्ता म्हणून प्रज्वलीत झालो. चंद्रकांत फलटण शहर अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी. चंद्रकांतचे हस्ताक्षर सुंदर मोत्यासारखे होते. आम्ही नेहमी एकत्रित बसून शहरातील विविध सामाजिक समस्या निवारण्यासाठी शासकीय कार्यालयांना पत्र लेखन करून करत असू.
समाजातिल अनिष्ट रूढी परंपरा कशा संपतील यावर चर्चा करत असू. समाजातील अंधश्रद्धा, वेसनाधिनता नष्ट करण्यासाठी चंद्रकांतने समाजांतर्गत स्वच्छता मोहीमच सुरू केली. त्यामध्ये दारूचे धंदे बंद केले. तर पोतराज मुक्त समाज केला. तसेच समाजांतर्गत वाद- भांडणे मिटवून समाजात शांतता निर्माण केली. अशातच गावातील अथवा ग्रामीण भागातील बांधवांवर अन्याय होत असेल तेव्हा चंद्रकांत अन पॅंथरर्स मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला धडकत. तेव्हा अधिकाऱ्यांशी चंद्रकांतचा होणारा संवाद रोमांच निर्माण करणारा असे.
चंद्रकांत आणि तालुकाध्यक्ष सुर्यकांत यांनी फलटण शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पॅंथरच्या छावण्या सुरू केल्या. बहुसंख्य छावण्या आठवले साहेबांच्या हस्ते सुरू झाल्या. वेळोशी गावच्या छावनीचे उद्घाटन रात्री १ वाजता आठवले साहेबांनी केले. प्रत्येक गावात ट्रकभरून तरूण पॅंथर जयभीम चा जयघोष करत जात असे. यामुळे तालुक्यांतील अन्याय नक्कीच कमी झाला. सातारा, पुणे, सोलापुर मुंबई अशा ठिकाणी पॅंथरच्या मेळाव्यांना आठवले साहेबांच्या आदेशाने चंद्रकांत शेकडो पॅंथर्सना घेऊन जात. ट्रक, ट्रकच्या मागे १०/१२ जीपगाड्यांत खचाखच भरलेले पॅंथर्स असा तांडा. जयभीमचा जयघोष. आणि कार्यक्रमातील रामदास आठवले साहेबांच्या जबरदस्त भाषणाने उपस्थित लाखो पॅंथर जबरदस्त नव उर्जा घेत असत.
१९८५ आधिच्या जयंती मुरवणुका सुद्ऱ्धा आजच्या सारख्याच अत्यंत आनंद, उत्साहात आणि धुमधडाक्यात निघत होत्या . परंतु त्यावेळी सर्वजन बॅंडवरच्या तालावर नाचत ,जल्लोष करत जात पण १९८६ च्या जयंती मिरवणूक अत्यंत उत्साहात जयभीमचा जय घोष करत दोन-दोनच्या जोडीने आणि ओळीत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू निघू लागली. शांततेत आणि शिस्तबद्ध मिरवणुकीची सुरूवात चंद्रकांतच्या मार्गदर्शनानेच सुरू झाली. त्यावेळची शिस्त आज ३६ वर्षे अखंड आहे. शिस्तबद्द जयंती मिरवणूक फलटणच्या चळवळीला चंद्रकातने दिलेली अविस्मरणीय भेट आहे.
सहकाराचे जाळं तयार करण्याचा प्रयत्न
No comments