वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने जिंकले रौप्य पदक
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकत 19 वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला आहे. अमेरिकेतील ओरगॉनमध्ये ही स्पर्धा सुरू होती. अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतराची नोंद केली आहे. या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. अंजू बॉबी जॉर्डने लांब उडीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. आता तब्बल 19 वर्षानंतर निरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळवले आहे.
39 वर्षापासून सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, तब्बल 19 वर्षांनंतर या चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळाले आहे. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. या चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच, या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.
रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
जागतिक अॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या सर्वोत्तम क्रीडापटूंपैकी एक असलेल्या क्रीडापटूची सरस कामगिरी!
जागतिक अॅथलेटीक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. भारतीय क्रीडा विश्वासाठी हा खास क्षण आहे. नीरजला त्याच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा.”
No comments