अंध अपंग विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार - आ. दीपकराव चव्हाण
![]() |
अंध अपंगांना भेट वस्तू देवून त्यांचे कौतुक करताना आ. दीपकराव चव्हाण, शेजारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ : केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांमधून अंध अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती त्याचबरोबर व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर जी मदत गरजेची असेल ती निश्चितपणे मिळवून देण्याची ग्वाही आ. दीपकराव चव्हाण यांनी दिली आहे.
अंध अपंग विकास संघ सातारा या संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अंध अपंग विद्यार्थ्यांचा मेळावा, गुणवंत अंध अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना भेट वस्तू प्रदान आणि या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधी याविषयी माहिती अशा येथील नवलबाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना आ. चव्हाण बोलत होते. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, भाजप अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, माजी नगरसेविका सौ. ज्योती खरात, साखरवाडीचे युवा नेते संजय भोसले यांच्या सह अंध अपंग विकास संस्था साताराचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांचे माध्यमातून समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या समस्यांची सोडवणूक, आवश्यक असेल त्यावेळी सर्वतोपरी सहकार्य आणि मदतीसाठी आपण स्वतः व आपला पक्ष कधीही मागे राहणार नाही, किंबहुना या कामात आमची आघाडी कायम राहिल याची ग्वाही यावेळी आ. दीपकराव चव्हाण यांनी दिली.
अंध अपंग बांधवांनी स्वतःला कोणत्याही बाबतीत कमी समजू नये आपल्या समाजाचे ते अविभाज्य घटक आहेत याची जाणीव सर्वांनीच ठेवली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करताना महेश अटक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील अंध, अपंग बांधवांना येथे एकत्र करुन फलटण कराना यामध्ये सहभागी करुन घेतल्याबद्दल आ. चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.
अंध अपंग विकास संघ सातारा या संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अंध अपंग विद्यार्थ्यांचा मेळावा, गुणवंत अंध अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना भेट वस्तू प्रदान आणि या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधी याविषयी माहिती अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना आ. चव्हाण बोलत होते. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, भाजप अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, माजी नगरसेविका सौ. ज्योती खरात, साखरवाडीचे युवा नेते संजय भोसले यांच्या सह अंध अपंग विकास संस्था साताराचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
![]() |
एस. टी. बस चालक राजेंद्र कदम यांचा सत्कार करताना अनुप शहा शेजारी मान्यवर. (छाया : योगायोग फोटो, फलटण.) |
या कार्यक्रमातच जीवन वाघमये यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये विविध करिअर संधी विषयी सखोल मार्गदर्शन केले, तर निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले यांनी दृष्टी नसल्याने येणाऱ्या अडचणी विशद करताना शरीरातील विविध अवयवांच्या कामकाज पद्धतीचा आढावा घेत त्यावर खर्च होणाऱ्या शारीरिक उर्जेतून मानवी जीवन कार्यरत रहाते, तथापि येथे दृष्टी नसल्याने त्यावर खर्च होणारी ऊर्जा अन्यत्र वापरली गेल्याने सदर व्यक्ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले नैपुण्य सिद्ध करीत असल्याचे सांगत अंध अपंगत्वावर मात करुन प्राप्त केलेल्या विविध विषयातील गुणवत्तेबाबत त्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
त्यानंतर समारोप प्रसंगी आ. दीपकराव चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते अंध अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, प्रवासासाठी बॅग व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून आलेले १० वी, १२ वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले सुरेश दुपाटे, अनिल करमळकर, किसन सुतार, आनंद जानकर, नंदकुमार कोळी वैष्णवी नावडकर, काजल शिरकावळे, गणेश निंबाळकर, अभय गायकवाड, रेखा कदम, विशाल शेंडे, तेजश्री सेजल, निकिता लांडगे व अजय साळुंखे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अनुप शहा, सौ. ज्योती खरात, पंडित ज्वेलर्स आणि इतरांनी दिलेल्या योगदानाविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
फलटण एस. टी. आगारात वाहक म्हणून काम करणारे राजेंद्र दशरथ कदम हे आपल्या सेवेमध्ये अशा अंध, अपंग, वृद्ध प्रवाशांना जाणीवपूर्वक मदत करतात म्हणून त्यांचाही कोविड योद्धा म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डी. के. पवार यांनी आपल्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल याची ग्वाही दिली.
प्रारंभी या संस्थेचे अध्यक्ष अजय घोरपडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, मुधोजी महाविद्यालयाचे उप प्राचार्य पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले. संस्थेचे महासचिव संतोष यादव यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रुपाली कांबळे व अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अशा कार्यक्रमातून दिव्यांग बांधवांना प्रेरणा मिळते व जीवनात काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण होते अशी भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
महेश अटक या अंध विद्यार्थ्यांने सदरचा कार्यक्रम फलटण मध्ये आयोजित करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची सर्वांनी स्तुती केली. मुधोजी महाविद्यालयाच्या एनएसएस मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी या कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.
No comments