Breaking News

पालखी सोहळा स्वछता मोहीम : जाधववाडी ग्रामपंचायतीकडून जंतूनाशक फवारणी

Palkhi Ceremony Sanitation Campaign: Disinfection spraying by Jadhavwadi Gram Panchayat

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण वरून पुढे गेल्यानंतर जाधववाडी ग्रामपंचायत कडून स्वच्छता करण्याचा दृष्टीने स्वच्छता मोहीम घेण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्वत्र जंतूनाशक पावडर फवारण्यात आली असल्याची माहिती  जाधववाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा आबाजी गायकवाड यांनी दिली.

    दरम्यान जाधववाडी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यासाठी विवीध पाऊले उचलण्यात आली आहेत, तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.   तुर्तास हवेतून होणारा जंतुप्रसार  रोखण्यासाठी  संपूर्ण परिसरात, तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या सभोवताली जंतूनाशक पावडर फवारली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य दीपकराव सपकळ यांनी दिली.

No comments