फलटण पंचायत समिती आरक्षण सर्वसाधारण - ११, ओबीसी -४, अनुसुचीत जाती- ३ ; सातारा जिल्हा परिषद - सर्व गट सर्वसाधारण
![]() |
लहान मुलीच्या हस्ते फलटण पंचायत समिती आरक्षण चिठ्ठी काढतना महसूल कर्मचारी. |
फलटण : अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तांतर नाट्य चांगलेच रंगले असताना आज तालुक्यातील ९ जिल्हा परिषद मतदार संघ (गट) आणि १८ पंचायत समिती मतदार संघ (गण) आरक्षणे सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली असून ९ पैकी ७ गट आणि १८ पैकी ११ गण सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुले राहिल्याने मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फलटण तालुक्यातील ९ जि.प. गटांपैकी
वाठार निंबाळकर आणि कोळकी हे २ गट सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी राखीव झाले असून उर्वरित सर्व ७ गट सर्वसाधारण झाले आहेत.
फलटण तालुक्यातील १८ गणांसाठी आरक्षण सोडत आज नगर परिषद नूतन सभागृहात छोट्या बालिकेच्या हस्ते चिठ्ठया काढून पूर्ण करण्यात आली, त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गट विकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्या सह अन्य अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी सदस्य, इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील ९ गटांची सोडत सातारा येथे काढण्यात आली त्यानुसार वाठार निंबाळकर व कोळकी हे दोन गट सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी राखीव आणि उर्वरित ७ सर्वसाधारण उमेदवारांसाठी खुले ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
फलटण तालुक्यातील १८ गणांपैकी ११ जागा सर्वसाधारण ४ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर अनुसुचीत जातीसाठी ३ जागांवर आरक्षण जाहिर करण्यात आले.
निश्चित झालेली गणनिहाय आरक्षणे पुढील प्रमाणे :
सर्वसाधारण ६ गण - पाडेगाव, तरडगाव, सस्तेवाडी, दुधेबावी, कोळकी, सासवड.
सर्वसाधारण महिला ५ गण - आसू, बरड, गिरवी, सुरवडी, सांगवी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग २ गण - साखरवाडी (पिंपळवाडी), गुणवरे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ गण - जिंती, राजाळे.
अनुसूचित जाती १ गण - वाठार निंबाळकर.
अनुसूचित जाती महिला २ गण - विडणी, हिंगणगाव.
No comments