संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप
सातारा, दि. 4 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी 28 जून ते 4 जुलै दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन कारुंडे जि. सोलापूर येथून पालखी सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments