दुचाकीच्या डिक्कीतून १८ हजार रुपयांची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोळकी ता. फलटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी असणाऱ्या नंदन डेअरीच्या समोर पार्क केलेल्या दुचाकी वाहनाची डिक्की उघडून १८ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २३ जून २०२२२ रोजी, दुपारी १२ .२० वाजण्याच्या सुमारास, सतीश शरद शहा रा. कोळकी ता.फलटण यांनी फलटण येथील कराड अर्बन बँकेच्या एटीएम मधून २० हजार रुपये रोख रक्कम काढली व त्याचे कराड अर्बन बँकेतून,१००,५०,२० व १० रुपये चलनाच्या सुट्ट्या नोटा घेतल्या. शहा यांनी रकमेतील १८ हजार रुपये दुचाकी वाहनाच्या डिक्की मध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी कोळकी ता. फलटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी असणाऱ्या नंदन डेअरीच्या समोर आपली दुचाकी क्र. एम.एच.११ एम.पी.०२६७ ही पार्क केली व दूध आणण्यासाठी गेले. हीच संधी साधून, अज्ञात चोरट्याने दुचाकी वाहनाची डिक्की उघडून, आतील १८ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली असल्याची फिर्याद सतीश शरद शहा यांनी दिली आहे.
No comments