वृंदावन ते वडाळा वस्तीगृह : रामदासजी आठवले
पॅंथर रामदासजी आठवले साहेब हे आमचे प्रेरणास्थान! फलटणकर आणि रामदासजी यांचा ऋणानुबंध दलित पॅंथर मुळे अधिकच दृढ झाला होता. फलटणमध्ये दलित पॅंथरची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पॅंथर गाजवली ते आमचे बंधू आणि पँथरचे अध्यक्ष चंद्रकांत अंबर अहिवळे यांनी. आज चंद्रकांत अहिवळे हे आपल्यात नाहीत. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या शोक सभेसाठी आज भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले फलटणला येत आहेत.
रामदासजी आठवले फलटणला आल्यानंतर आम्ही त्यांची व्यवस्था वृंदावन लॉजमध्ये करीत होतो. अर्थातच ते पॅंथर असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण त्यांचे नेहमीच अनुकरण करीत असतात. फलटणचे वृंदावन लॉज ते वडाळ्याचे सिद्धार्थ वस्तीगृह येथील रामदासजी आठवले यांची 'रूम' आजही सर्वांचे आकर्षण आणि प्रेरणास्थान बनले आहे. कारण अनेक सामाजिक उपक्रम, नामांतर चळवळ, पॅंथरवादी, परिवर्तनवादी चळवळ यांची आठवण आजही रामदासजी आठवली यांच्या वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या सिद्धार्थ वस्तीगृहातील रूम नंबर ५ मुळे होते. आमच्या हातात असते तर आम्ही तो रूम संरक्षित म्हणून घोषित केला असता असे आम्हाला वाटते.
No comments