प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
ध्वजारोहण करताना माजी प्राचार्य श्री.अर्जुन रुपनवर व इतर मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल व ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण, येथे दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्यात उत्साहात पार पडला. यावेळी श्री.अर्जुन रुपनवर माजी प्राचार्य मुधोजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटण, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणास विशेष उपस्थिती सौ.सुलोचना पवार, श्री.पांडुरंग पवार, श्री राजन जगदाळे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, श्री.निखिल भोईटे चार्टर्ड अकौंटंट, श्री.नामदेव ननवरे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.विनोद चव्हाण सुभेदार, श्री.विजया नाळे सरपंच ग्रामपंचायत कोळकी, सौ.संगीता दोशी अध्यक्षा संगिनी फोरम, श्री.आबा लाड समन्वयक पाणी फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आमंत्रित पाहुण्यांचे, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, व पालक यांचें शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.अमित सस्ते सर यांनी केले. त्याचबरोबर संगिनी फोरम यांच्या फाउंडेशनच्या वतीने संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका माननीय सौ.संध्या गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा सन्मान करून शाळेस दान निधी व फर्स्ट एड किट देण्यात आले.
मनोऱ्याचे सादरीकरण करताना विद्यार्थिनी |
ध्वजारोहण झाल्यानंतर इ.९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी परेडद्वारे राष्ट्रध्वजास सलामी दिली. त्यानंतर नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर व महापुरुषांचे विचार, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी केले. इ.१ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांनी रंगीत कवायतीचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता ९वी व १०वीच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे मनोऱ्याचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता ६ वी ते इ ८ वीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता, स्वच्छता, भ्रष्टाचार बंदी,व राष्ट्रगीताचा मान,या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने माजी सैनिक, परिसरातील क्रीडा खेळाडू, शेतकरी पालक, इयत्ता १० वी,१२ वी उत्कृष्ट गुण संपादन केलेले विद्यार्थी, नवोदय परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय हॉकी खेळाडू कु.अक्षदा ढेकळे, किक बॉक्सिंग खेळाडू, कु.कादंबरी मोरे व कु. गीतांजली बंडगर, रनिंग गोळाफेक कु.गणेश काशिद, यांचाही संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
श्री मोहसीन मुलाणी यांनी सर्व पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. इंडियन ज्युनियर राष्ट्रीय हॉकी प्लेयर कु. अक्षदा ढेकळे यांनी क्रीडा क्षेत्रातून देशासाठी केलेले कामगिरी तसेच मिळालेली पदके व फलटण मधुन असल्याचा अभिमान त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मान्यवरामध्ये श्री.राजन जगदाळे यांनी स्कॉलरशिपच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची कशी प्रकारे तयार केली जाते याचे मार्गदर्शन केले व शाळेचे भरभरून कौतुक त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. अर्जुन रूपनवर यांनी संस्थेच्या कार्यामध्ये विद्यार्थी शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. माजी सैनिक, शेतकरी पालक, यांच्या सत्कार बद्दल आनंद व्यक्त केला व चांगल्या पद्धतीचे शिक्षण चांगली पिढी घडविण्याचे सामाजिक कार्य संस्थेच्या मार्फत केले जात आहे व संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
७५ वा अमृत महोत्सवानिमित्त या अभियाना अंतर्गत प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांना व पालकांना ऐतिहासिक घटनाक्रम पाहण्यासाठी चित्रकला व ऐतिहासिक घटना प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य श्री. संदीप किसवे, पर्यवेक्षक श्री अमित सस्ते, समन्वयिका सौ.माधुरी काटकर, सौ सुवर्णा निकम, श्रीमती योगिता सस्ते, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी -विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहीनी कोरडे, व सौ.सुनिता सोनवले यांनी केले आणि आभार श्री.ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.
No comments