मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा
ध्वजारोहण करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , सचिव फ.ए.सोसायटी, फलटण यांच्या शुभहस्ते व श्री. संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित सर व कनिष्ठ विभागाची उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
ध्वजारोहण झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पावसाळी आंतर कुल स्पर्धेत , तसेच इतर स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नागपूर या ठिकाणी कॅप्टन पदाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कॅप्टन प्रा. संतोष धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एन. एस. एस.च्या वतीने शहिदांच्या स्मरणार्थ जयराम स्वामी वडगाव , पुसेसावळी येथून आणलेली 'शहीद ज्योत' प्रमुख पाहुण्यांच्या कडे सोपवण्यात आली. यानंतर संपादक मंडळांनी तयार केलेल्या जलसंधारण व जलसंवर्धन या विषयावर लिहिलेले लेख , व्यक्तिचित्र , रांगोळी स्पर्धा यांचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्री.संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कुमारी प्रांजली ढालपे १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने काढलेली व्यक्तीचित्रे विशेष लक्ष वेधून घेत होती , या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी विशेष उपक्रम म्हणून 'उदय' वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पाडला. यावेळी एन.एस.एस.च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , त्यात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , सेक्रेटरी फ. ए. सोसायटी, फलटण , श्री. संजय भोसले , सदस्य फ.ए.सोसायटी, फलटण, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम , युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर श्री. भाऊ कापसे , फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, वरिष्ठ विभागाची उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक तसेच माझी प्राचार्य , उपप्राचार्य एन.सी.सी. , एन.एस.एस चे विद्यार्थ्यी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक , मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.तुकाराम शिंदे व कॅप्टन प्रा. संतोष धुमाळ यांनी व आभार प्रा. दिलीप शिंदे यांनी मानले.
No comments